Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘आम्ही दोघे आमदार एकत्र हडपसरचा विकास करू’; तुपेंच्या विजयाचे टिळेकरांकडून आवाहन

पुणे : सन २०१४ ते २०१९ दरम्यान मी आमदार असताना ज्या पद्धतीने विकासाची कामे केली. त्या कामांना पुढे आमदार चेतन तुपे यांनी गती देण्याचे काम केले आहे. आता मी विधान परिषदेत आमदार आहे आणि चेतन तुपेही पुन्हा एकदा आमदार झाले तर, आम्हीं दोघे आमदार एकत्र येऊन हडपसरचा विकास अतिशय चांगल्या प्रकारे करू. त्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा चेतन तुपे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना ऐतिहासिक विजयी करायचे आहे. असे आवाहन विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केले.

हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या रॅली निमित्ताने कार्यकर्त्यांची संवाद साधताना आमदार योगेश टिळेकर बोलत होते. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्षाने आपापली बलस्थाने भक्कमपणे सांभाळीत एकत्रित ताकद महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या मागे उभी करायची आहे. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक आपण लढवत असून आपला विजय निश्चित होणार आहे. असा विश्वासही यावेळी आमदार टिळेकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा    –      ‘भाजपाचं सरकार येणार नाही, तर..’; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान 

महायुतीचे उमेदवार चेतन तुपे म्हणाले की, हडपसर मतदारसंघात परत एकदा आमदार रिपीट होणार आहे. राज्यात डबल इंजिन सरकार आणायचे आहे आणि त्याची सुरुवात हडपसर मधून करायची आहे. आम्हीं दोघे एवढं चांगलं काम करू की इथल्या प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटेल. विधानसभा आणि विधानपरिषद मध्ये आम्ही दोघेही अतिशय उत्कृष्ट काम करून दाखवू.

देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने विकास झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आतिशय उत्तम प्रकारे काम सुरू आहे. महिलांसाठी ,लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी ,तरुण उद्योजक , युवकांसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीचे निर्णय आजवर महायुती सरकारने घेतलेले आहेत.आमदार योगेश टिळेकर यांनी आणि २०१९ ते २०२४ मध्ये आमदार चेतन तुपे यांनी जे काम केले आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हडपसर मतदार संघामध्ये विकासाची गंगा आणायाची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला महायुतीचा आमदार म्हणून चेतन तुपे यांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.

– प्रमोद भानगिरे शहरप्रमुख , शिवसेना पुणे शहर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button