breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#Waragainstcorona: संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका; 153 जणांवर गुन्हे दाखल

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे.  संचारबंदीचे पालन न करणाऱ्या 153 जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नागरिकांची वाहने देखील जप्त करण्यात येत आहेत.

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत घराबाहेर फिरणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या 153 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच नागरिकांची वाहने देखील जप्त करण्यात येत आहेत. आरोपींना पोलीस तात्काळ न्यायालयात हजर करत असून न्यायालय संबंधितांना दंड अथवा कैदेची शिक्षा सुनावत आहे. संचारबंदी सुरू असताना नागरिकांनी संचार बंदीचे उल्लंघन केल्यास संबंधितांना पोलिसांकडून दिले जाणारे दाखले आणि परवाने भविष्यकाळात मिळणार नाहीत,  असे पुणे ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button