breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#War Against Corona : हडपसर-काळेपडळ परिसरात गोरक्षनाथ मंदिरातर्फे गरजूंसाठी अन्नछत्र

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन केल्याने अनेक गरीब, गरजू, रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांची उपासमार होत आहे. त्यांना दोन वेळचे जेवण मिळावे, या उद्देशाने हडपसर येथील काळेपडळ परिसरातील गोरक्षनाथ मंदिर देवस्थानच्या वतीने अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. मंदिराचे संस्थापक आचार्य महंत चंद्रकांत आबनावे यांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून हे अन्नछत्र उभारले आहे. आज या अन्नछत्राचा लाभ सकाळी व संध्याकाळी मिळून चार ते साडेचार हजार लोकांना होत आहे.

काळेपाडळ व हडपसर भागातील बेरोजगार मजूर वर्गाला या अन्नछत्रामुळे पोटभर जेवण मिळत आहे. शिजवलेल्या अन्नाचे मोफत पाकिटे दिली जात असून, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रसाद आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, समन्वयक भागुजी शिखरे यांनी अन्नदान करून या उपक्रमाला सक्रिय सहाय केले आहे. या भागातील एकही गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, असा आमचा प्रयत्न असून, ज्यांना यात सहकार्य करायचे आहे किंवा गरजूंना जेवण हवे आहे, अशांनी ९२२६२६१७७२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महंत चंद्रकांत आबनावे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button