breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘समाजसेवेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचे सहाय्य घ्यावे’; डॉ. दीपक शिकारपूर

पुणे :  शहरी समस्यांचे स्वरूप समजून घेणे, त्यांच्या निराकरणाचे उपाय योजणे यासाठी काळानुरूप कृत्रिम बुद्धिमत्तेचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सहाय्य घेतले पाहिजे, असे मत प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. शहरातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी स्टार्टअप्स गांभीर्याने विचार करावा, असेही त्यांनी सुचवले. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीच्या ‘माझे शहर, माझे वचन’ या अभियानाअंतर्गत समाजोपयोगी सेवाकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या फिरोदिया सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे माजी प्रांतपाल आणि पीएनजी एक्स्ल्युझिव्हचे भागीदार अभय गाडगीळ हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष विष्णु भेडा आणि सचिव विशाल कुलकर्णी हे ही व्यासपीठावर उपस्थित होते.

हेही वाचा –  होर्डिंगधारकांनी घेतला कारवाईचा धसका

याप्रसंगी जीवित नदी या संस्थेला नदी पुनरुज्जीवन विषयात केलेल्या कामासाठी, सोहम् ट्रस्ट यांना गरिबांचे पुनर्वसन व वैद्यकीय उपचार/ शुश्रुषा यातील कामासाठी, डू सेव्ह संस्थेला रस्ते सुरक्षा व इतर सामाजिक कार्यासाठी, पुणे ग्रीन हिल्स गृपला हरित टेकडी संवर्धनासाठी तर स्टुडिओ अल्टरनेटिव्ह या संस्थेला रचनात्मक पुनर्वापर क्षेत्रात केलेल्या कामासाठी सन्मानित करण्यात आले. तसेच, आम्रपाली चव्हाण व संतोष परदेशी यांना रचनात्मक पुनर्वापर क्षेत्रातील कामासाठी, सुनील जोशी व शैलेंद्र पटेल यांना जलस्त्रोत पुनरुज्जीवनासाठी तर सतीश खाडे यांना जलसंवर्धन विषयात केलेल्या कामांसाठी रोटरीच्या वतीने यावर्षीचे ‘माय सिटी माय प्रॉमिस सर्व्हिस एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते

‘माझे शहर, माझे वचन’ या अभियानाच्या संचालक प्रियांका कर्णिक तसेच रोटरीच्या व्होकेशनल सर्व्हिसेसच्या संचालक आकांक्षा रांजेकर यांनी उपक्रमाची माहिती दिली. डॉ. शंतनु देशपांडे यांनी आभार मानले. मंजिरी शहाणे यांनी सूत्रसंचालन केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button