breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर नाव न घेता हल्ला

पुणे :  शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात शिवसैनिकांचा संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांचे नाव न घेता त्यांना ढेकणांची उपमा दिली. त्यामुळे पुन्हा भाजप आणि शिवसेना उबाठामधील वाद रंगणार आहे. यावेळी पुणे शहराचा विकास करताना नदीचा प्रवाह भाजप बंद करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तू राहूच शकत नाही, तुझ्या बंदोबस्त करण्यासाठी मी मैदानात उतरलो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यात तुमच्यासमोर येतोय. आज मला जाहीर सभा घ्यायची होती. आता लढाई मैदानात होणार आहे. हॉलमध्ये होणार नाही. मी परवा शिवसैनिकांसमोर मी बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील. त्यानंतर माझ्या पायाशी कलिंगड ठेवले गेले. काही जणांना वाटले मी त्यांना आव्हान दिले. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष. मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटाने चिरडले जात आहे. त्यानंतर ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस.

हेही वाचा –  पुणे घाट भागात पुढील 4 तासात विजांच्या कडकडाटसह मुसळधार पावसाची शक्यता

पुण्यात मुळा मुठा नदी आहे. त्याबाबत व्यंकय्या नायडू आले होते. त्यांनी मुळा मुठा हे काय नाव आहे. व्यंकय्या नाव ठेवायचं का की मोदी नदी म्हणायचे का?. त्यांनी नद्यांची नावे बदलायला सांगितली. नावं तर बदलू शकत नाही. पण त्यांनी प्रवाह बदलला. पुण्यात नाईक बेट आहे. या नाईक बेटाचे दोन्ही बाजूने प्रवाह बंद केला. प्रवाह बंद करून घरे बांधली. मग नदी का घुसणार नाही इकडे तिकडे. मला पुण्याचा शाश्वत विकास करायचा आहे.

मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती. कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते. आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता. यांनी तो स्टे काढला. त्यांनी नदीच्या जागेवर कामे सुरू केली. हा विकास म्हणायचा. हा विकास नाही. विखार आहे. म्हणूनच आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्यासाठी तू राहशील किंवा मी राहील. तू विकासाच्या नावाखाली वाट लावली. त्यामुळेच आम्ही बोलत आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button