महिलेला भेटण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण, एकाचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
![Two persons who came to meet the woman were beaten to death, one died on the spot and another was seriously injured](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Assault-1573201490.jpg)
पुणे | पुण्यातील कोंढवा परिसरातून आज सायंकाळी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. एका महिलेला भेटण्यासाठी आलेल्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रवी कचरू नागदिवे (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेत एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मयत रवी हा उरळीकांचन येथून कोंढवा परिसरात एका महिलेला भेटण्यासाठी रिक्षा करून आला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी रवी आणि रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये रवीचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मयत आणि जखमी दोघांनाही रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.