उरुळी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा रोखला; घटनास्थळी पुणे पोलिस अधीक्षक दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-73-780x470.jpg)
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पुण्यातून पुढे प्रस्थान केल्यानंतर उरुळी कांचन येथे पालखीचा नगारा रोखण्यात आला आला आहे. गावकरी आणि विश्वस्त यांच्यामध्ये वाद झाल्याची माहिती असून घटनास्थळी पुण्याचे पोलिस अधीक्षक दाखल झाले आहेत.
उरुळी कांचनमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखीचा नगारा अडवण्यात आलेला आहे. उरुळी कांचन गावामध्ये दरवर्षीच्या मार्गावरून पालखी घेऊन न गेल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालखी थांबवलेली आहे. त्यामुळे विश्वस्त आणि उरुळी कांचनचे ग्रामस्थ यांच्यामध्ये वाद झाला.
हेही वाचा – ‘समाजसेवेच्या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचे सहाय्य घ्यावे’; डॉ. दीपक शिकारपूर
दरम्यान, घटनास्थळी पुणे अधीक्षक पंकज देशमुख दाखल झाले आहेत. पोलिसांकडून ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत् सुरु असून पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटोपून यवतच्या दिशेने मुक्कामी निघाल्याची माहिती आहे.