ताज्या घडामोडीपुणे

तिहेरी हत्याकांडाने मावळ तालुका हादरला

तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

तळेगाव : अनैतिक संबंधातून राहिलेला गर्भ नष्ट करण्यासाठी गर्भपात करत असताना एका युवतीचा मृत्यू झाला. ज्या इसमामुळे ती महिला गरोदर राहिली त्या इसमाने तिचा मृतदेह नष्ट करण्याच्या हेतूने इंद्रायणी नदीत फेकून दिला. यावेळी त्या महिलेच्या दोन लहान मुलांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज गप्प करण्यासाठी त्या लहानग्यांना देखील त्या नराधमाने जीवंत नदीत फेकून दिले. याबाबत मृत महिलेल्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीमुळे हे तिहेरी हत्याकांड उघडकीस आले.या प्रकरणी   चार जणांवर गुन्हा दाखल झाला  असून दोन आरोपींना अटक केली आहे.

समरिन निसार नेवरेकर वय 25, इशांत निसार नेवरेकर वय 5 वर्षे, इजान निसार नेवरेकर वय 2 वर्षे अशी मृतांची नावे आहेत.

या प्रकरणी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वय 37 रा.वराळे ता.मावळ, रविकांत भानूदास गायकवाड वय 41 रा.डाॅन बास्को काॅलनी सावेडी ता.अहमदनगर अशी अटक केलेल्यांची नावे असून यातील गर्भपात करणारी महिला व संबधीत डाॅक्टर ला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर वय – ३७ वर्षे रा. समता कॉलनी वराळे ता. मावळ जि. पुणे, रविकांत भानुदास गायकवाड वय-४१ वर्षे रा. डॉन बास्को कॉलनी ईश्वरानंद सोसायटी, सावेडी ता. जि. अहमदनगर यांनी संगनमत करुन फिर्यादी गुलाम कादीर महदहमिफ यांची मयत मुलगी समरीन निसार नेवरकर (वय २५) वर्षे, ही आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर याच्यापासून अनैतिक संबंधातून गरोदर राहिल्याने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला कळंबोल येथे अमर हॉस्पीटल येथे दाखल केले.

तेथे तिचा गर्भपात करत असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हालगर्जीपणामुळे उपचारादरम्यान समरीन मृत पावली. याबाबत तेथील डॉक्टरांनी पोलीसांना माहीती देणे आवश्य होते. मात्र तसे त्यांनी न करता मृतदेह रविकांत भानुसदा गायकवाड, बुधवंत नामक महिलेच्या ताब्यात दिला. त्यानंतर आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर, रविकांत भानुदास गायकवाड या दोघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने समरन नेवरेकरकच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तळेगावकडून चाकणकडे जाणारे दिशेला इंदोरी गावच्या बाजून जाणाऱ्या रोडवरील इंद्रायण नदीच्या पुलावरुन वाहत्या नदी पात्रात फेकुन दिला. सोबत तिचा मुलगा इशांत निसार नेवरेकर वय (५ वर्षे) इजान निसार नेवरेकर (वय २) वर्षे या दोन्ही मुलांना इंद्रायणी नदी पात्रात जिवंत फेकून दिले. ही घटना 6 ते 9 जुलै दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर, रविकांत भानुदास गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. गर्भपात करण्यास सहाय्य करणारी बुधवंत नामक महिला तसेच कळंबोली येथील अमर हॉस्पिटलमधील डॉक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला हरविली असल्याची तक्रारदेखील तळेगाव एमआयडीसी पोलिसांत दाखल करण्यात आली होती. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

सहाय्यक पोलिस आयुक्त देवीदास घेवारे यांनी  घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश बांगर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम मस्के ,उपनिरीक्षक सीताराम पुणेकर, अनील भोसले हवलदार भवारी यांनी गुन्हा उघडकीस आणला

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button