पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला वेग
![The work of Hinjewadi-Shivajinagar metro line in Pune is speeding up](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/New-Project-49-1-780x470.jpg)
पुणे : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून मेट्रोसाटी ११२ खांबांची उभारणी झाल्यानंतर खांब गर्डरने जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रोचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाला देण्यात आले आहे.
त्यासाटी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या स्वतंत्र हेतू उद्देश कंपनीची स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापना करण्यात आलेली आहे.ही मार्गिका एकूण २३.३ किलोमीटर अंतराची आहे. या मार्गावर सध्या विविध ठिकाणी गर्डर काम हाती घेण्यात आलेले आहे. या प्रत्येक गर्डरची लांबी सुमारे ७०.५ मीटर आहे. प्रकल्पासाठी अशा एकूण आठ गर्डरची बांधणी केली जाणार आहे.
यापैकी हिंजवडी फेज तीन येथे आणि बालेवाडी स्टेडियम येथे मिळून ३ गर्डर टाकण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. तसेच बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटी येथे चौथ्या गर्डरच्या जुळणीचे काम सुरू करण्यात आले आहे.हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प आहे.