ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वार्थासाठी कधीही पक्षनिष्ठा बदलली नाही; जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही!

मिशन–PCMC : प्रभाग क्रमांक २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा निर्धार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (वाकड–ताथवडे–पुनावळे) येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची एकजूट आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या विकासकामांच्या बळावर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रभाग क्रमांक २५ साठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत — २५ (अ) वाघमारे विक्रम भास्कर (अनुसूचित जाती – पुरुष), २५ (ब) दर्शले रेखा राजाभाऊ (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला), २५ (क) पवार चित्रा संदीप (सर्वसाधारण – महिला), २५ (ड) कलाटे मयूर पांडुरंग (सर्वसाधारण – पुरुष).

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना उमेदवार मयूर कलाटे यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधणे हेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. “जनतेच्या अमूल्य विश्वासावर आणि कामाच्या ताकदीवर आम्ही पुन्हा एकदा मतदारांसमोर जात आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा      :            इंद्रायणीनगर-भोसरी प्रभागात भाजपाच्या प्रचाराचा ‘‘विजयी शंखनाद’’

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी पक्षांतराच्या राजकारणावर टीका केली. “स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांनी पक्षनिष्ठा बदलली, मात्र आम्ही कधीही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही आणि देणारही नाही. ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सातत्य, निष्ठा आणि कामातून उत्तर देणे हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय मार्ग असल्याचे सांगत, सत्य आणि विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवून प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा आपली साथ द्यावी, असे आवाहन उमेदवारांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

जनतेच्या विश्वासावर उभे राहूनच मी आजपर्यंत काम केले आहे. स्वार्थासाठी कधीही पक्षनिष्ठा बदलली नाही आणि पुढेही बदलणार नाही. प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न माझा प्रश्न आहे. विकास, पारदर्शकता आणि न्याय या मूल्यांवर ठाम राहून प्रभाग क्रमांक २५ च्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने कार्यरत राहीन, हीच जनतेला दिलेली माझी ग्वाही आहे.

– मयूर कलाटे, उमेदवार, प्रभाग- 25, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button