breaking-newsताज्या घडामोडीपुणे
खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-34-2-780x470.jpg)
पुणे : खडकवासला धरण साखळी तो होत असलेल्या पावसामुळे धरणातून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सोमवारी (दि. 29) दुपारी 12 वाजता 25 हजार 36 क्युसेकने विसर्ग केला आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील संविधान भवन ‘दृष्टीक्षेपात’
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. सोमवारी दुपारी 12 वाजता 25 हजार 36 क्यूसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे उपविभागीय अभियंता, मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाकडून सांगण्यात आले आहे.