तळेगाव दाभाडेत सहस्त्रचंडी यागासह भव्य पुण्योत्सवाचे आयोजन
वतननगर येथे ३ ते ११ फेब्रुवारी दरम्यान होणार धार्मिक सोहळा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-03-at-7.10.38-PM-1-720x470.jpeg)
तळेगाव दाभाडे : भारतीय सनातन परंपरेत अत्यंत पुण्यकारक मानल्या जाणाऱ्या सहस्त्रचंडी यागासह विविध धार्मिक विधींनी संपन्न होणाऱ्या भव्य पुण्योत्सवाचे आयोजन वतननगर येथे करण्यात आले आहे. श्री गणेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री जयसिंग भालेराव व त्यांच्या परिवारातर्फे ३ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.
या पुण्योत्सवात सहस्त्रचंडी याग, होम हवन, हजार सप्तशती पाठ, शंभर पाठांचे हवन, कुमारी पूजन, सुहासिनी पूजन, शतपक्षीय ग्रहयज्ञ, अष्टवधान सेवा, पूर्णाहूती, ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद असे विविध धार्मिक विधी होणार आहेत.
या अनुष्ठानाचे वेदशास्त्रसंपन्न धर्मपीठ प्रसारक गुरूजन व वेदमूर्तींनी पावन उद्घोषणा केली असून, श्री जयसिंग भालेराव व सौ. निलीमा जयसिंग भालेराव यांच्या हस्ते होम हवन संपन्न होईल. वेदमूर्ती मयूर शेंडे गुरुजी आणि संतोष महाराज लवटे यांच्या धर्मपीठ पौरोहित्य व्यवस्थापनात हे विधी पार पडणार आहेत.
हेही वाचा : किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे?
धर्मपीठातील महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज, ह.भ.प. डॉ. नारायणमहाराज जाधव, शांती ब्रह्म श्री मारुतीबाबा कुरेकर, पं.पू. सद्गुरू माऊली अनुराधाताई अमरसिंह देशमुख आदी गुरूजनांचे आशीर्वचन भाविकांना लाभणार आहेत. तसेच, डॉ. प्रमोद बोराडे यांचे ऐतिहासिक संशोधनावर आधारित व्याख्यान देखील या सोहळ्यात होणार आहे.
यागाची पूर्णाहूती ह.भ.प. चैतन्य महाराज कबीरबुवा यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. तळेगाव दाभाडे आणि परिसरात प्रथमच एवढ्या भव्य स्वरूपात सहस्त्रचंडी अनुष्ठानाचे आयोजन होत असून, या पुण्यस्मरूप सोहळ्याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जयसिंग भालेराव व परिवारातर्फे करण्यात आले आहे.