तालेब शाह महाराष्ट्र वरिष्ठ हॉकी संघाचा कर्णधार
![Taleb Shah captains Maharashtra senior hockey team](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pjimage-2021-12-10T213845.975.jpg)
पिंपरी चिंचवड | आघाडीच्या फळीतील तालेब शाह याच्याकडे 11 व्या राष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा उद्यापासून (ता. 11) पिंपरी-चिंचवड येथे सुरू होणार आहे. हॉकी महाराष्ट्राने या स्पर्धेसाठी आज महाराष्ट्राचा 18 सदस्यीय संघ जाहीर केला.तीन आठवड्याच्या निवड प्रक्रियेनंतर हा संघ निवडण्यात आला. माजी ऑलिंपियन अजित लाक्रा, डॉ. धनराज पिल्ले, विक्रम पिल्ले आणि विश्वकरंडक खेळाडू एडगर मस्करेन्हस यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ निवडण्यात आली असून मस्करेन्हस यांची या संघाचे प्रशिक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा हॉकी छत्तीसगड, हॉकी मिझोराम, हॉकी बिहार यांच्यासह एच गटात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राची पहिली लढत रविवारी (ता. 12) हॉकी मिझोरामशी होईल.
संघ – तालेब शाह (कर्णधार), आकाश चिटके (गोलरक्षक), मोझेस पुल्लांथरा, अक्षय आव्हाड, राहुल शिंदे, अनिकेत गुरव, अजित शिंदे, महंमद निझामुद्दिन, वेंकटेशन केंचे, टिकाराम ठकुला. दर्शनवैभव गावकर, योगेश बोरकर, प्रणव माने, रजत शर्मा, प्रताप शिंदे, गुफरान शेख, करण ठाकूर, अरविंद यादव, प्रशिक्षक – एडगर मस्करेन्हस, व्यवस्थापक – सागर सिंग ठाकूर