breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील ‘एल थ्री’ बारमधील पार्टीत मुंबईतून मेफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघांना अटक

पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड लिजर लाऊंज (एल थ्री) बारमध्ये झालेल्या बेकायदा पार्टीत मेफेड्रोनचे सेवन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांच्या पथकाने एका तरुणाला मुंबईतील गोरेगावमधून ताब्यात घेतले. पार्टीसाठी त्याने मुंबईतून मेफेड्रोन आणल्याचे तपासात निष्पन्न झाले, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

नितीन ठोंबरे (वय ३४, रा. गोरेगाव, मुंबई) करण मिश्रा (वय ३४, रा. मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एल थ्री बारमध्ये रविवारी मध्यरात्रीपर्यंत पार्टी सुरू होती. बारमधील प्रसाधनगृहात तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसंनी एल थ्री बारच्या मालकासह आठजणांना अटक केली.

पार्टीत सामील झालेल्या काही जणांची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. मात्र, रक्त तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. तांत्रिक तपास करून पोलिसांनी पार्टीत अमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोघांना मंगळवारी अटक केली. ठोंबरे याला गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली. ठोंबरे वास्तूविशारद म्हणून काम करतो. मिश्रा हा एका नामांकित कंपनीत संगणक अभियंता दोघे मित्र आहेत. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली

हेही वाचा    –      झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, मराठमोळा तुषार देशपांडेही भारतीय संघात 

याप्रकरणात पोलिसांनी लिक्विड लीजर लाउंज (एल थ्री) बारचे जागामालक संतोष विठ्ठल कामठे (रा. ४४७/४, रजनिगंधा अपार्टमेंट, शिवाजीनगर), बारचालक उत्कर्ष कालिदास देशमाने (रा. फ्लॅट नं. ३०२, साईप्रसाद अपार्टमेंट लेन नं. १० मुंजाबा वस्ती, धानोरी), योगेंद्र गिरासे (रा. भूगाव), रवी माहेश्वरी (रा. एच १००६, ३८२ पार्क, मॅजेस्टिक, उंड्री), पार्टीचे आयोजक अक्षय दत्तात्रेय कामठे (रा. हडपसर), डिजे दिनेश मानकर (रा. नाना पेठ), तसेच पार्टीचे आयोजन करणारे रोहन राजू गायकवाड (रा. भोसले पार्क, हडपसर) आणि मानस मलिक (वय ३३, रा. फ्लॅट नं. ४२, जयजवान नगर, राम मंदिराजवळ, येरवडा) यांना अटक केेली.

बारमध्ये बेकायदा पार्टीचे आयोजन आरोपी अक्षय कामठे याने केले होते. पार्टीसाठी ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात शुल्क स्वीकारण्यात आले होते. सोशल मीडियात कामठे याने पार्टीची जाहिरात प्रसारित केली होती. पार्टीत सामील झालेल्या ४० ते ४५ जणांची पोलिसांनी चाैकशी केली. पोलिसांनी आठ आरोपींपैकी तिघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच पार्टीत सामील झालेल्या काहीजणांचे रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रक्त तपासणीचा अहवाल अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button