Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मी ४१५८ कोटींचा विकास निधी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या’; सुनिल शेळके यांचं विरोधकांना खुले आव्हान

केवळ मला बदनाम करून तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही : सुनिल शेळके

केंद्रात, राज्यात महायुतीचे सरकार, महाविकास आघाडीच्या आमदार निधी कसा मिळणार : सुनिल शेळके

मावळ | मी मावळ तालुक्यासाठी ४,१५८ कोटींचा विकास निधी आणून दाखवला, तुम्ही निदान ८,००० कोटींचा निधी आणण्याचा शब्द तरी मावळच्या जनतेला द्या, असे खुले आव्हान मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी विरोधकांना दिले.

आमदार शेळके यांनी मंगळवारी नवलाख उंब्रे, बधलवाडी, परिटवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी व सुदुंबरे या गावांचा प्रचारदौरा करीत जनसंवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ठिकठिकाणी वाजत-गाजत मिरवणुकीने, पुष्पवृष्टी करीत, फटाके वाजवून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

केवळ सुनिल शेळकेवर आरोप करून, त्यांना बदनाम करण्यामुळे तुम्ही ही निवडणूक जिंकू शकणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. राज्यात महायुतीचे पुन्हा सरकार येणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. केंद्रातही महायुतीचेच सरकार आहे. त्यामुळे तालुक्यातील महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला निवडून दिले तरी तो तालुक्यासाठी किती विकास निधी आणू शकतो, असा सवाल आमदार शेळके यांनी केला.

हेही वाचा     –        ‘अजित गव्हाणे यांच्यासारख्या उमद्या नेतृत्वाला संधी द्या’; जयंत पाटील 

नवलाख उंबरे येथे गणेशआप्पा ढोरे, संतोष दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रम कदम, कृति समिती अध्यक्ष देविदास पडवळ, माजी उपसरपंच रवींद्र कडलक, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल अध्यक्ष जालिंदर शेटे, सरपंच सविता बदले, उपसरपंच राहुल शेटे, माजी सरपंच पांडुरंग कोयते, माजी उपसरपंच हनुमंत कोयते, मयूर नरवडे तसेच अशोक जगनाडे, नवनाथ पडवळ, युवा उद्योजक राजू कडलक, तानाजी पडवळ, चंद्रकांत कदम, लक्ष्मण नरवडे, बळीराम मराठे आदी मान्यवर, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही निवडणूक जनतेच्या विकासाची आहे. महायुतीला मत म्हणजे विकासाला मत होय, असे आमदार शेळके म्हणाले.

परिटवाडीत साडेनऊ कोटींची विकासकामे

परिटवाडीतील विकासकामांसाठी आपण तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. निवडणुकीनंतर गावच्या मंदिरासाठी देखील भरीव मदत करण्याचा शब्द शेळके यांनी यावेळी दिला. त्यावेळी तुकाराम पापळ, संदीप पापळ, भगवान बदले, सागर जाधव आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाधववाडीत मताधिक्याचा निर्धार

जाधववाडी येथेही आमदार शेळके यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी अर्जुन जाधव, सोसायटीचे अध्यक्ष तानाजी जाधव, उपाध्यक्ष बबन जाधव, प्रसिद्ध गडा मालक किरण जाधव, उद्योजक चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायात सदस्य गोरख काळोखे तसेच मनोहर जाधव, मुरली जाधव, राजू जाधव आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जाधववाडीत आमदार शेळके यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार उपस्थित ग्रामस्थांनी केला.

सुदुंबरे येथे जंगी स्वागत

सुदुंबरे गावात भव्य मिरवणुकीने आमदार शेळके यांचे स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. संत जगनाडे महाराज समाधी मंदिर परिसरत विकास आराखड्याच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदारांना धन्यवाद दिले. गावाच विकास अधिक गतीने होण्यासाठी आमदार शेळके यांनाच पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. त्यावेळी सरपंच सविता गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदुंबरे अध्यक्ष संतोष गाडे तसेच ताराचंद गाडे, माणिक गाडे, मोहन काळडोके, बाळा अंबुले, जालिंदर गाडे, उमा शेळके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button