ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणे

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे – जिल्हा दंडाधिकारी

पुणे ः निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. यासोबतच कसबा व चिंचवड विधानसभा मतदार संघात मतदार जागृतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले उपस्थित होते.

त्यासाठी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी मतदार जागृती कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे डॉ.देशमुख यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या. भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचा आणि परिपत्रकांचा आढावा घेण्यात यावा. कोविडबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करण्याची काळजी घ्यावी.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, निवडणूक संबंधित सर्व कक्ष तातडीने सुरू करावेत. निवडणुकीच्या काळात गांभीर्याने काम करा आणि दैनंदिन अहवाल सादर करा. निवडणुकीच्या कामासाठी लागणारे मनुष्यबळ नियोजन करावे. दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोपे व्हावे यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असेही ते म्हणाले. निवडणूक कामासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button