ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील समाधान चौक परिसरात रस्त्यात भला मोठा खड्डा

अग्निशामक दलाच्या जवानांकडून दोरखंडाने ट्रक काढण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यातील समाधान चौक परिसरात रस्त्यात भला मोठा खड्डा पडल्याचा प्रकार समोर आला आहे. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात हा खड्डा पडला आहे. विशेष म्हणजे रस्त्यात भलंमोठं भगदाड पडल्याने ट्रक खड्ड्यात फसला आहे. ट्रकसह दोन दुचाकीदेखील या खड्ड्यात पडल्या आहेत. घटनेनंतर तातडीने अग्निशामक दलाचे जवान पोहोचले आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांकडून ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्ता चांगाला असताना त्याला अचानक खड्डा काय पडलो आणि ट्रक पाहता-पाहता थेट 30 ते 40 फूट खाली जातो हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना नेमकी कशामुळे घडली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. संबंधित ट्रक हा पुणे महापालिकाचा असल्याची माहिती आहे. या घटनेत ट्रक चालक हा थोडक्या बचावला आहे. त्याने प्रसंगावधान साधत थेट ट्रकमधून उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. दरम्यान, आता घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रसत्यावर अचानक हा खड्डा पडला. पुणे महापालिकाचा ट्रक संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास सिटी पोस्ट इमारतीच्या परिसरात आला होता. ड्रेनेज लाईन साफ करण्यासाठी या ट्रकला बोलवण्यात आलं होतं. पण हा ट्रक रिव्हर्स घेत असताना अचानक मागे भलामोठा खड्डा पडला. हा खड्डा हळहळू खोल होत गेला आणि पुणे महापालिकेचा पू्र्ण ट्रक खड्ड्यात गेला आहे. सुदैवाने या ट्रकच्या चालकाने खिडकीतून उडी मारली. त्यामुळे तो बचावला.

यानंतर आता अग्निशामक दलाच्या जवानांकडून दोरखंडाने ट्रक काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण ते खूप आव्हानात्मक आहे. खड्डा हा जवळपास 30 ते 40 फूट खोल असल्याचं अग्निशामक दलाच्या जावानांकडून सांगण्यात येत आहे. ट्रकला बाहेर काढण्यासाठी आता जेसीबी बोलावण्यात आलं आहे. जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात येणार आहे. अचानकपणे हा खड्डा नेमका पडला कसा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. याआधी शहरात अशाप्रकारचा खड्डा कुठेही पडला नव्हता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button