Pune | लोणावळ्यात चक्क ‘पॉर्न फिल्म’चे शुटींग, १३ जणांना अटक
![Shooting of porn film in Lonavala, 13 people arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Lonavala-780x470.jpg)
पुणे | पुण्यात ड्रग्ज रॅकेट उघडकीस येत असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे लोणावळ्यात एक खळबळ उडावणारी कारवाई ग्रामीण पोलिसांनी केली केली. लोणावळ्यात एक व्हीला भाड्याने घेऊन त्याठिकाणी चक्क ‘पॉर्न फिल्म’ करण्याचे कारनामे सुरू करण्यात आले होते. याबाबतचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर याठिकाणी छापा टाकण्यात आला. परराज्यातील तरुणी आणि तरुण असे १५ जणांचे टोळके या पॉर्न फिल्म तयार करीत असल्याचे समोर आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी १३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक भारत भोसले(Lonavala) यांनी सरकारी फिर्याद दिली आहे. यानुसार विश्णु मुन्नासाहब साओ (वय-३०, रा.१६ परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (वय-३५, रा. आहरा उमरी, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय 23, रा. आरपी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय ३८, रा. गणेशपुरी, मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय २१, रा. लक्ष्मीनगर, शखरपुर, दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय-२९, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर), समीर मेहताब आलम (वय २६, रा. अमरोहा, राईड मॉक्सी, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (वय २९, रा. काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय २१, रा. रोनक सिटी, शाम कॉलनी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय ३२, रा. केंगार चाळ, खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय २८, रा. सनसिटी, नालासोपारा वेस्ट, जि. पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय ३८, रा. मोहनचाळ, वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय १९, व्यवसाय मेकअप आर्टीस्ट, रा. रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात), वंशज सचीन वर्मा (वय २१, रा. डेहराखास, डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (वय २०, रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) यांच्यासह बंगला चालक सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२, रा. मळवली, ता. मावळ), आकेष गौतम शिंदे (वय ३२, रा. मळवली, ता. मावळ) व सनी विलास शेंडगे (वय ३५, रा. मळवली, ता. मावळ, जि.पुणे) यांच्या विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या पूर्वी पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या आर्णव व्हील या बंगल्यात सदरचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ अधिकचा तपास करत आहेत.