धक्कादायक! 12वीचे मार्क वाढवून देतो म्हणत शिक्षकाची विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी
![Shocking! Saying that the mark of 12th grade increases, the teacher demands physical comfort from the student](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/Teacher-Pune.jpg)
पुणे – शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. 11वी मध्ये शिकणाऱ्या मुलीला 12वी मध्ये मार्क वाढवून देतो असं सांगत शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना सांगताच त्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे.
12वीत मार्क वाढवून देतो, पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी मागणी या शिक्षकाने केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय. पालकांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला. तसंच त्याच्या तोंडाला काळंही फासलं.
संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुणे शहरात हा प्रकार घडल्यामुळे सर्व स्तरातून त्या शिक्षकाविरोधात संताप व्यक्त केला जातोय.11वी मध्ये शिकत असलेल्या मुलीला 12वी ला मार्क वाढवून देतो व पैसे देतो फक्त तुला शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी शिक्षकाकडून विद्यार्थिनीला मागणी करण्याची संतापजनक व लज्जास्पद घटना पुण्यात घडली. असल्या घटनांच सत्र राज्यात सुरू आहे. जनता वाऱ्यावर आणि सत्ताधारी एकमेकांना सांभाळण्यात दंग आहेत, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधलाय.