‘ही निवडणूक गावकी भावकीची नसून देशाचं भवितव्य ठरवणारी’; शिवाजीराव आढळराव पाटील
![Shivajirao Adharao Patil said that this election is not about the sentiments of the village but it is about deciding the future of the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Shivajirao-Adhalrao-Patil-and-Amol-Kolhe-1-780x470.jpg)
पुणे | कोणतीही निवडणूक म्हटल की ती गावकी – भावकी भोवती फिरत असते, मात्र देशाचा नेता निवडण्याची निवडणूक भावनिक किंवा अन्य पातळ्यांवर होऊनये यासाठी काही नेते आग्रही आहे. निवडून येण्याच्या मेरिटवर जसे तिकीट मिळत आहे तसेच काम करण्याची क्षमता ओळखून मतदान करण्याचे आवाहन करताना नेते दिसत आहेत. यातूनच लोकसभेची ही निवडणूक गावकी भावकीची नसून देशाचं भवितव्य ठरवणारी असल्याचे, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलें आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे नारायणगावच्या दौऱ्यावर असताना येथील गावकऱ्यांनी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढली. तसेच शिवजन्मभूमीचा पुत्र म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी ग्रामस्थांनी यावेळी जाहीर पाठिंबा दिला. यावरून जेव्हा आढळराव पाटील नारायणगावमध्ये गेले तेव्हा आढळरावांनी गावकऱ्यांना असा चिमटा काढला.
हेही वाचा – शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची ‘या’ कार्यकर्त्यांनी घेतली शपथ
आढळराव पाटील म्हणाले, ही निवडणूक गावकी भावकीची नाही. तर देशाचा पंतप्रधान देशाचा नेता ठरवण्याची आहे. आगामी पाच वर्षाच्या काळात देशाचा नेता हा जागतिक पातळीवर आपल्या देशाला कुठे नेऊन ठेवतो. आपली अर्थव्यवस्था कितव्या क्रमांकांवर येईल हा विचार करण्याची आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा.