breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा पुण्यात शिवसेनेकडून आनंदोत्सव

पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी ते आझाद मैदान मुंबई पायी मोर्चा निघाला होता याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होत मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरला होता.

मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी येथे पोहचला असताना याची दखल घेत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक चर्चा करत ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे. त्यांच्या सर्व पितृसत्ताक रक्त नातेवाईकांना, सगे सोयाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील वंचित घटकाला याचा फायदा होणार आहे.

हेही वाचा  – ‘आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा’; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सूचक इशारा

शासन निर्णयाचे स्वागत करीत पुण्यात शिवसेनेकडून फटाक्यांची आतषबाजी करीत, गुलाल उधळून,एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की,  धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीदिनी एकनाथ शिंदे यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण बहाल केले आहे.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, प्रकाश तरवडे,नाना तरवडे,विक्रम घाडगे,सचिन भानगिरे,संदीप घुले, निवृत्ती तरवडे,संतोष रजपूत,दत्ता भानगिरे,अण्णा भानगिरे,रवींद्र भानगिरे , आकाश भानगिरे, मयुर तरवडे  PMPML चे विजय पांढरे व असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button