ताज्या घडामोडीपुणे

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य

संत तुकाराम महाराजांच्या पालखीला संभाजी भिडे यांची धारकरी मानवंदना

पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. वारकरी आणि धारकरी संगम हा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. कुत्र्याला लांबचं ऐकायला येतं. वटवाघळाला येतं. गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत आहे. ह्या व्रताची पथ्य आहेत, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.

स्वातंत्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अशा 10 – 10 हजरांच्या तुकड्या दररोज रायगडावर जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजरांची तुकडी करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं आपल्याला तयार करायची आहेत. आपल्या जे स्वातंत्र्य मिळाल ते हांडगं स्वातंत्र्य आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खर स्वातंत्र्य आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले आहेत.

संभाजी भिडे यांनी पुण्यातील जेएम रोडवरील जंगली महाराज मंदिरात जात दर्शन घेतलं. पालखी पुण्यात दाखल झाल्यानंतर भीडे गुरुजी थोड्याच वेळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी आणि वारकऱ्यांसोबत वारीत सहभागी होणार आहेत. वारीत सहभागी होण्याआधी भिडे गुरुजी यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही जंगली महाराज मंदिरात दर्शन घेतलं. संभाजी भिडे यांच्यासोबत वारीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून शिवप्रतिष्ठानचे धारकरी जंगली महाराज मंदिरात दाखल झाले आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना संबोधित केलं. तेव्हा वटपौर्णिमेबाबत त्यांनी हे विधान केलं आहे.

संभाजी भिडेंना पोलिसांची नोटीस
पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस पाठवली आहे. आज पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे आज करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीला संभाजी भिडे यांचे धारकरी मानवंदना देणार आहेत. दरवर्षी पालखी सोहळा पुण्यात आल्यावर शिव प्रतिष्ठानचे धारकरी मानवंदना देत असतात. यापूर्वी भिडे गुरुजी समर्थकांनी वारीत शस्त्र आणले होते. त्यावरून वाद झाला होता. यंदा पोलिसांनी आधीच त्यांना नोटीस पाठवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button