संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज प्रस्थान, ‘असे’ आहे पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/www.mahaenews.com-8-1-780x470.jpg)
पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने शनिवारी (दि. 29) सायंकाळी प्रस्थान होणार आहे. ही पालखी पुणे, सासवड, जेजुरी, माळशिरस मार्गे पंढरपूरला दाखल होणार आहे. या पालखीचे संपूर्ण वेळापत्रक पाहूया.
हेही वाचा – ‘आमची आघाडी हाच आमचा चेहरा’; मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची भूमिका
29 जून – आळंदी येथून प्रस्थान
30 जून – भवानी पेठ, पुणे
1 जुलै – पुणे
2 जुलै – सासवड
3 जुलै – सासवड
4 जुलै – जेजुरी
5 जुलै – वाल्हे
6 जुलै – लोणंद
7 जुलै – लोणंद
8 जुलै – तरडगाव. चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण.
9 जुलै – फलटण विमानतळ
10 जुलै – बरड
11 जुलै – नातेपुते
12 जुलै – माळशिरस. पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण.
13 जुलै – वेळापूर. खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण.
14 जुलै – बंडीशेगाव. ठाकूर बुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण.
15 जुलै – वाखरी. बाजीराव ची विहीर वाखरी येथे दुसरे उभे आणि चौथे गोल रिंगण.
16 जुलै – पंढरपूर. तिसरे उभे रिंगण.
17 जुलै – आषाढी एकादशी