महसूल अधिकाऱ्यांनो, फील्डवर जा!; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

पुणे : राज्यातील महसूल यंत्रणा लोकाभिमुख करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट परिपत्रक जारी करून जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांना फील्डवर जाण्याचे आदेश दिले आहेत.
यामध्ये म्हटल्यानुसार, “जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून एकदा, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी दोनवेळा आपल्या क्षेत्रात दौरा करावा. आपल्या विभागातील शासकीय ध्येयधोरणे व योजना जनतेपर्यंत पोहोचतात, की नाही याचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा असे म्हटले आहे. या कामात कोणी कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल,’ असेही बजावण्यात आले आहेत.
हेही वाचा : सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर २१ फेब्रुवारीपासून ‘पवनाथडी’ जत्रा
बावनकुळे यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परिपत्रकाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. या परिपत्रकात मुख्यमंत्र्यांच्या या संदर्भातील निर्देशांचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
या भेटीदौऱ्यांचे मॉनिटर करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार करून त्याद्वारे दौऱ्याचे नियोजन करून विभागीय आयुक्त कार्यालयाने या संदर्भात समन्वय राखावा अशा सूचना दिल्या आहेत.




