Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
भारतीय लष्करातील निवृत्त कर्नल लक्ष्मीकांत देसाई यांचे निधन
मरणोत्तर देहदान करुन समाजासमोर आणखी एक आदर्श
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Dr.-Neelam-Gorhe-1-8-780x470.jpg)
पुणे : निवृत्त कर्नल लक्ष्मीकांत देसाई यांचे नुकतेच (दि २८) निधन झाले.सैन्य दलात ३४ वर्ष सेवा बजावून ते निवृत्त झाले होते.
निवृत्त कर्नल लक्ष्मीकांत देसाई यांचे जन्मगाव मालवण होते. काही वर्षांपासून ते हडपसर येथे वास्तव्यात होते. देशाचा सेवेसाठी सतत तत्पर असणाऱ्या देसाई यांनी मरणोत्तर आपला देहदान करण्याची इच्छा दर्शवली होती.
हेही वाचा : PCMC | अतिक्रमण कारवाईला विरोध; चिखली-कुदळवाडीतील व्यापारी रस्त्यावर!
त्यानुसार कुटुंबांनी त्यांचे देहदान मिलिटरी मेडिकल कॉलेजमध्ये केले. आपल्या या कार्यातून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे. ” प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची ” याप्रमाणे यांनी आपले जीवन व्यतीत केले, प्रमाणिकपणे देशसेवा केली. अशा भावना त्यांच्या आप्तस्वकीयांनी व्यक्त केल्या