Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘नदी सुधार प्रकल्पातील त्रुटी व निसर्गास बाधक बाबी दूर करा’; डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : पुण्यातील नदी सुधार योजनेच्या ४४ किलोमीटर कामातील एक टप्पा राम-मुळा संगम येथील जागा पाहणी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. नदीचे पात्र रुंद असून ते अबाधित ठेवावे व झाडे तोडली जाऊ नयेत असा आमचा आग्रह आहे, असे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. यासंदर्भात नजीकच्या काळात विभागीय आयुक्त डॉ. महेश पुलकुंडवार यांच्याकडे महापालिका व पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांसह व पर्यावरण स्नेही संस्थांना घेऊन बैठक आयोजित केली जाणार आहे. तूर्त सद्यस्थितीमधील कामे थांबवण्यात आल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह अधिकारी, जीवित नदी संस्थेसह पुणे रिव्हर रिव्हर्सल संस्थेच्या शैलजा देशपांडे व अन्य पदाधिकारी, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यात केंद्राच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून ४४ किलोमीटरच्या एकूण कामासाठी सुमारे ४७०० कोटी रुपये निधी आवश्यक आहे. या कामाचा एकंदरीत डीपीआर झाला असून यात काही त्रुटी आहेत. शिवाय बंडगार्डन येथील कामादरम्यान नदीत भराव टाकून नदीचे पात्र कमी करण्यात आले आहे. २०० वर्षांपेक्षा जुन्या वृक्षांची कत्तल केली जात आहे. याविषयी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे डॉ. कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा  :  बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी कृती आराखडा राबवा; आमदार अमित साटम

या व्यतिरिक्त ज्या स्ट्रेचमध्ये अद्याप काम चालू नाही, सर्वे करून झाडांवर क्रमांक टाकण्यात आले आहेत, भराव टाकण्याबाबत डीपीआर तयार होत आहेत, अशा स्ट्रेचेसमधील कामे त्वरित थांबवावीत यासाठी जीवित नदी संस्थेकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. या अनुषंगाने ही जागा पहाणी आयोजित केली होती. या पाहणीदरम्यान राम नदीसह मुळा नदीवर संगम औंध येथे राम नदीवरील भराव टाकण्याचे काम सुरू असल्याचे उघड झाले. यासोबतच, मुळा नदीपात्रात ३०० ट्रक राडारोडा टाकण्यात आलेला असून  झाडांवर क्रमांक टाकण्यात आलेले आहेत. तसेच,  पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत भराव टाकण्याचे कंत्राटद्वारामार्फत सुरू असल्याचे उघड झाले.

यावेळी  पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, पर्यावरण विभाग प्रमुख संजय शिंदे, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, प्रकल्प विभागचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उप अभियंता मुकुंद शिंदे, महापालिका परिमंडळ २ चे उपायुक्त अविनाश संकपाळ, प्रकल्प सल्लागार एचपीसी यांचेकडून अर्चना कोठारी, अरबाज, औंध क्षेत्रीय कार्यालय सहा आयुक्त गिरीश दापकेकर, पुढे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, पुणे रिव्हर रिव्हावल समूहाकडुन श्रीमती शैलजा देशपांडे, प्राजक्ता महाजन, मुकुंद मालवणकर व इतर (जीवीतनदी), रुपेश केसेकर, चैतन्य केट, मेघना भंडारी (पुणे संवाद), ऍड. अमेय जगताप, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ, ऍड पी. डी. तारे (बाणेर बालवाडी नागरिक मंच), वेताळ टेकडी बचाव समिती प्राजक्ता पणशीकर, पुष्कर कुलकर्णी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“नदीपात्रात भराव टाकल्याने नदीचे पात्र कमी होऊन मानव निर्मिती अडथळे व पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक रहिवासी संस्थांमध्ये पाणी शिरते व जीवनमान विस्कळीत होते. नदीला नैसर्गिक सुंदरता आवश्यक असून भरावासारख्या अनैसर्गिक गोष्टींची बाधा, वृक्षतोड, पक्षांच्या अधिवासाचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही.”

डॉ. मेधा कुलकर्णी, खासदार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button