breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे
राज ठाकरे उद्यापासून दोन दिवसीय पुणे दौर्यावर
![Raj Thackeray to visit Nashik from today! The election trumpet will be blown](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/raj-thackeray1-1.jpg)
पुणे- आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे उद्या शुक्रवारपासून पुन्हा एकदा दोन दिवसीय पुणे दौर्यावर जाणार आहेत. या दोन दिवसीय पुणे दौर्यात राज ठाकरे पक्षातील पदाधिकार्यांची बैठक घेणार आहेत.
तसेच उद्या सकाळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरातील राज ठाकरे यांचा हा चौथा पुणे दौरा आहे. राज ठाकरे हे 6 ऑगस्टलाही पुणे दौर्यावर गेले होते.