देशातील तापलेल्या सर्वाधिक शहरांच्या यादीत पुणे शहर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-17-780x470.jpg)
पुणे: यंदा शहरात थंडी जाणवलीच नाही. त्यामुळे फेब्रुवारीतच शहर उन्हाच्या झळांनी तापले आहे. गत 48 तासांत शहराचे तापमान सरासरी 35 ते 37 अंशांवर गेल्याने पुणे देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेले आहे.
यंदा देशातील तापलेल्या शहरांत पुणे शहराचे नाव सर्वांत पुढे आहे. राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच पारा 35 ते 37 अंशांवर गेला आहे. यात पुणे जिल्ह्यासह शहरातील सर्वंच भागांचे तापमान राज्यात सर्वात जास्त आहे.
हेही वाचा – राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी बांगलादेशींवर कारवाई करा; विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचा आंदोलनाचा इशारा
पुणे शहरातील कोरेगाव पार्क, सोलापूर, वाशिम, वर्धा या शहरांत सर्वाधिक तापमानाची स्पर्धा आहे. यात सलग दोन दिवस पुणे शहरातील कोरेगाव पार्क आघाडीवर होते. तेथे शुक्रवारी हंगामातील सर्वोच्च 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती, तर शनिवारी आणि रविवारी 36 अंशांवर पारा गेला होता.
गत 48 तासांत शहरातील सरासरी तापमानाचा अभ्यास केला असता असे लक्ष येते की, सोलापूर, वर्धा, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील कमाल तापमान राज्यात सर्वाधिक आहे. यातही कोरेगावचे तापमान शुक्रवारी राज्यात सर्वाधिक 37 अंशांवर गेले होते. पुणे शहराचा सरासरी पारा 35 ते 36 अंशांवर देशात सर्वात वेगाने गेला आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते प्रदूषणामुळे शहरात कमालीचा उकाडा जाणवत आहे.