breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सार्वजनिक शौचालय तोडले, पुण्याच्या महापौरांविरोधात गुन्हा दाखल

पुणे – महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा न्यायालयाने पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश दिले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालय ठेकेदार असलेल्या त्यांच्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शहरातील अतिक्रमणावर केलेल्या या कारवाई दरम्यान झालेल्या वादानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन एक महिन्यांत अहवाल द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी कोथरूड परिसरातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम तोडण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. या कारवाईवरुन मोठा वाद झाला होता. परिसरातील नागरिकांनी जागा सोडून जावे यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच ही कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवीदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने याबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर जिल्हा न्यायालयाने सुनावणी करताना पोलिसांना गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचारले असता त्यांनी म्हटले, या प्रकरणात आपण सविस्तर माहिती घेऊन आपली बाजू लवकरच मांडणार असल्याचे सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button