Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

“आरोप सिद्ध करा, नाहीतर मीच गुन्हा दाखल करणार”; त्या व्हायरल व्हिडिओवरून मेधा कुलकर्णींचे थेट आव्हान

पुणे : नुकताच सोशल मीडियावर राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचा काही नागरिकांशी हुज्जत घातल्याचा  व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ हनुमान जयंतीच्या दिवशीचा असून दर्ग्यात जाऊन अजान बंद करण्याची मागणी केली व हुज्जत घातली असा आरोप नॅशनल कॅान्फरन्स फॅार मायनॅारिटी संस्थेने केला आहे. आता या प्रकरणी स्वत: मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत आरोप सिद्ध करुन दाखवा अन्यथा मी गुन्हा दाखल करण्याची मागणी करेल, असे खुले आव्हान दिले आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी खासदार मेधा कुलकर्णी दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हनुमान मंदिराशेजारी असलेल्या दर्ग्यात सुरू असलेली अजान बंद करावी यासाठी तिथे असलेल्या भाविकांबरोबर हुज्जत घातल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संस्थेचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केला आहे. तसेच याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असून खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा –  ‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर नवीन पिढीला मराठी भाषा आलीच पाहिजे’; उपमुख्यमंत्री अजित पवार

याबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडले. त्या म्हणाल्या मी रस्त्यावर होते हे संबंधित व्हिडीओ चित्रणामध्ये स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे दर्ग्यात जाण्याचा प्रश्नच नाही. हनुमान जयंती असल्याने आम्ही तिथे दर्शनासाठी आलो होतो. अजानचा आवाज कमी करावा, असे त्यांना सांगितले. त्यामुळे हुज्जत घालण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे संबंधित संस्थेने केलेले सर्व आरोप त्यानींच सिद्ध करावे, अन्यथा मी त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे कुलकर्णी म्हणाल्या.

आम्ही दर्शनासाठी गेलो असताना त्यांनी गैरवर्तन केल्याचे त्या व्हिडिओत दिसते आहे. तसेच मी कानावर हात ठवलेले आहेत. त्यामुळे माझी सुरक्षितता धोक्यात आलेली आहे. यासंदर्भात मी पोलिसांना माझी सुरक्षितता जी आहे याची काळजी घेण्याची विनंती केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button