दुसरे लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीवर आत्महत्येसाठी दबाव, गुन्हा दाखल
![Pressure on first wife to commit suicide for second marriage, crime filed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-21T115945.033.jpg)
पुणे | दुसरे लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीला आत्महत्या कर म्हणून दबाव टाकणाऱ्या आणि आईच्या उपचारासाठी माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन येण्याची मागणी करणाऱ्या नव-याविरोधात चतुशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 29 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. प्रतीक कांबळे याच्यासह त्याच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा पती व सासू-सासरे यांनी संगनमत करून सासुबाई च्या उपचारासाठी माहेरून पन्नास हजार रुपये घेऊन ये, अशी मागणी फिर्यादीकडे वारंवार केली. तसेच पती प्रतीक कांबळे याने मला प्रेयसीबरोबर लग्न करायचे आहे तू आत्महत्या कर, माझ्या आयुष्यातून निघून जा असे म्हणून शिवीगाळ व मारहाण केली.हा सर्व प्रकार 3 फेब्रुवारी ते 25 जून या दरम्यान घडला. दरम्यान सतत मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने फिर्यादी या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.