ताज्या घडामोडीपुणे

Social activities: ‘प्रेरणा’च्या माध्यमातून नागरिकांना मदतीचा हात!

माजी सरपंच सखाराम शिंदे : गडद परिसरातील ११० नागरिकांची तपासणी

राजगुरूनगर : प्रेरणा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण रोजगारीच्या संधी व ग्रामीण भागातील नागरिकांना मदतीचा हात देवू, असा संकल्प माजी सरपंच सखाराम शिंदे यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सामाजिक संस्था प्रेरणा सोशल फाउंडेशन यांनी खेड तालुक्यातील दुर्गम भागात आरोग्य शिबीर घेतले. फौंडेशनच्या संस्थापिका अक्षता शिंदे यांच्या संकल्पनेतून गडद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू तपासणी, गरजूंना मोफत काळे चष्मे वाटप ,मोफत औषधे वाटप, आरोग्य तपासणी असे भव्य आरोग्य शिबीर पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रजचे संचालक अरुण चांभारे व खेड पंचायत समितीच्या माजी उपसभापती मंदाताई शिंदे व शिक्षक सहकारी पतसंस्था मा,सभापती प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते झाले. नि:स्वार्थी, नि:स्पृह भावनेने काम करणार्‍या युवा सामाजिक कार्यकर्त्या अक्षता वैभव शिंदे यांच्या कार्यामुळे समाजातील असमतोलाची दरी काही अंशी कमी होताना दिसते. समाजमन आणि समाजभान जपणाऱ्या शिंदे यांच्या भावी विधायक कार्यास शुभेच्छा देतो, असे मनोगत चांभारे यांनी यावेळी व्यक्त केले.

या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा परिसरातील 110 नागरिकांनी लाभ घेतला. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 25 नागरिकांनी नाव नोंदणी केली.

फाउंडेशनचे तब्ब्ल ५८ उपक्रम…

सरपंच सखाराम शिंदे, शिक्षक सहकारी पतसंस्था मा,सभापती प्रभाकर शिंदे , गडद गावचे सरपंच चंद्रकांत शिंदे, शिवे गावचे सरपंच अक्षय शिवेकर, आंभू गावचे सरपंच ज्ञानदेव कांबळे, विठ्ठल राजगुरव, भागुजी राजगुरव, मारुती तळेकर, संजय शिंदे, मारुती तळेकर यांनी शिबिराला भेट देऊन फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. युवा उद्योजक वैभव शिंदे यांनी प्रस्ताविकात फाउंडेशनच्या ५८ उपक्रमांची माहिती दिली आणि सरतेशेवटी आभार प्रदर्शन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button