Political Controversy : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आता अमृता फडणवीस यांना काय म्हणाल्या? वाचा!
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने बांगड्या भरल्या आहेत का, अशी टीका केली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी फडवणीस यांनी महिलांची माफी मागण्याची विनंती केली होती. त्यानंतर हा बांगड्यांचा वाद अधिकच उफाळून आला आहे. आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अमृता फडणवीस यांच महाराष्ट्रासाठी योगदान काय आहे? असा प्रश्न विचारला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना कोषामध्ये राहणाऱ्या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. `आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेशमाच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं तुमचं आयुष्य आहे, असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनीदेखील अमृता फडणवीस यांच महाराष्ट्रासाठी योगदान काय आहे असल्यचा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.