breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील प्रसिद्ध पबवर पोलिसांची धडक कारवाई

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यातील सगळ्या हॉटेल आणि पब, बार यांना आस्थापना सुरू ठेवण्यासाठी रात्री १:३० पर्यंत परवानगी दिली आहे. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत एलरो आणि युनिकॉर्न हाऊस हे दोन्ही पब रात्री १:३० नंतर सुद्धा सर्रास सुरू होते. भल्या मोठ्या डी जे  साऊंड सिस्टिम ने नागरिक हैराण होत असल्याच्या तक्रारी सुद्धा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंाने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री उशिरा कारवाई केली आहे. अमन शेख, संदीप सहस्रबुद्धे, रश्मी कुमार, सुमित चौधरी आणि प्रफुल गोरे या पब मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुण्यातील हे दोन्ही नामांकित पब आता पोलिसांकडून सील करण्यात आले आहेत.

पुण्यातील “एलरो” आणि “युनिकॉर्न हाऊस” या  नामांकित पब्स वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. रात्री १:३० नंतर सुद्धा डी जे वाजवून आस्थापना चालू ठेवत असल्याने गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी साऊंड सिस्टिम, हुक्का पॉट यासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही पब मधून पोलिसांनी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘उमेदवाराला निधी मिळाला म्हणजे जनतेचे प्रेम मिळाले असे नव्हे’; मुरलीधर मोहोळ

पुण्यात राज्यातून मोठ्या प्रमाणात तरुणाई आली आहे. त्यात पुण्यात मोठ्या आयटी कंपन्यादेखील आहे. राज्यातील विविध भागातून आलेले तरुण-तरुणींमुळे आणि पुणेकरांमुळे पुण्यातील नाईटलाईफमध्ये मोठा बदल झाला आहे. मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीत भर पडण्याची अनेक कारणं आहेत. मात्र पुण्यातील नाईटलाईफमध्ये झालेला बदल आणि पब, हॉटेल्समुळे अनेक लोक रात्रीचे बाहेर पडतात. त्यात हुक्का आणि मद्यप्राशन करतात. त्यामुळे रात्री हा धिंगाणा अनेकदा रस्त्यावर दिसतो. हाच धिंगाणा रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्वाची पावलं उचलली आहे. त्यांनी प्राथमिकरित्या काही नियमावली घालून दिली आहे.  मात्र या नियमांचं उल्लंघन करताना काही पब दिसत आहे. त्यामुळे या पब्सवर कारवाई करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button