breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

सभोवती घडणाऱ्या गोष्टीची माहिती न घाबरता पोलीसांना द्या; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे नागरिकांना आवाहन

अमली पदार्थानापासून दूर राहण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

शिवसेना, युवासेना व भाजयुमो यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे | अमली पदार्थांपेक्षा वाईट कोणतीही सवय नाही. अमली पदार्थ हे मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक आहेत. आपल्या कुटुंबाला आपल्या कृत्याची लाज वाटेल, अशी कोणतीही कृती तुम्ही करू नका. गेल्या काही दिवसात संस्कृतीक राजधानी असलेल्या पुण्यात अमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा उपस्थित झाला आहे, यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आपण देखील अशा गोष्टी आपल्या सभोवती घडत असतील, याबाबत न घाबरता पोलीसांना माहिती द्या, असे आवाहन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.

शिवसेना, युवासेना व भाजयुमो यांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथे करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, शिवसेना युवा सेनेचे राज्य सचिन किरण साळी, भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका ज्योत्स्ना एकबोटे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव आदी मान्यवर उस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना युवासेनेचे शहरप्रमुख निलेश गिरमे, भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. निवेदिता एकबोटे यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पोलीस दल असले तरी काही गोष्टीना मर्यादा येतात. त्यामुळे सजग नागरिक म्हणून आपण समाजातील प्रत्येक गोष्टीकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे. सजग नागरिक हा पोलीसांचे डोळे असतात. असे काही प्रकार तुम्हाला दिसले तर आत्मविश्वासाने पोलीसांकडे जा, नक्कीच ते तुम्हाला सर्वतोपरी मदत करतील, यांची मी तुम्हाला ग्वाही देतो.
पोर्शे कार प्रकरणात पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केले. त्यात त्यांना तात्पुरते यश देखील मिळाले, मात्र, सुरुवातीनंतर यातील प्रत्येकावर कारवाई झालेली आहे. या प्रकरणामध्ये असलेले आज तुरुंगात आहेत, असे अमितेश कुमार बोलताना म्हणाले.

हेही वाचा     –      हिंजवडीतील ‘कोंडी’ सोडविण्यासाठी शंकर जगताप सरसावले! 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आम्ही अमली पदार्थांपासून आयुष्यभर दूर राहू अशी शपथ घेतली. या कार्यक्रमासाठी सुमारे ७०० पेक्षा अधिक विद्यार्थिनी सहभात घेतला. यामध्ये दहावी ते पदवी पर्यंतचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उपायुक्त संदीप सिंग गिल, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका ज्योत्स्ना एकबोटे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजिका डॉ. निवेदिता एकबोटे यांनी केले तर आभार आयोजक निलेश गिरमे यांनी व्यक्त केले.

कठोर कारवाई होणे आवश्यकच

गेल्या काही दिवसांत अमली पदार्थाच्या सेवन या संदर्भात मोठा गदारोळ उठला आहे. यामुळे सुशिक्षित असणारे पुणे शहर, अजून या अमली पदार्थांमुळे रसातळाला जावू नये, विद्यार्थ्यामध्ये या विषयी जनजागृती व्हावी, या उद्देश्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशा गोष्टींवर पोलिसांनी, प्रशासनाने, खंबीर भूमिका घेवून असे कृत्य करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी, आशी आमची मागणी शिवसेना, युवासेनेचे शहरप्रमुख निलेश गिरमे यांनी केली.

भ्रष्टाना सहज सोडणार नाही..!

ज्यांना पोलीस यंत्रणा पूर्णपणे भ्रष्ट वाटत असेल, तर तसे नाही. काही पोलीस असतील, हे मान्य केले तरी सर्वच यंत्रणा भ्रष्ट नाही. आम्ही भ्रष्ट पोलीस किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या कुणालाच आम्ही सहज सोडणार नाही. नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा आपली सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे, असे अमितेश कुमार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button