कारगिल विजय दिनानिमित्त पोलिसांचे रक्तदान शिबीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-52-780x470.jpg)
पुणे : कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन,रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड व लायन्स क्लब ऑफ पुणे ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस हॉस्पिटल(शिवाजीनगर) येथे शुक्रवार (दि.26) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 60 पोलिसांनी रक्तदान केले. जमा झालेले रक्त आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (ए.एफ एम.सी.,सदर्न कमांड) ला देण्यात आले.
शिबिराला अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार, ए.सी.पी. योगेश मोरे यांनी भेट दिली. यावेळी मनोगत व्यक्त करताना अप्पर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया म्हणाले ,’जवान आपल्या देशाची बाह्य सुरक्षा बघतात आणि आम्ही अंतर्गत सुरक्षा बघतो. आमच्या जवानांनाही वाटते आपणही अजून काही तरी देशासाठी करावं आणि आज आपण आम्हाला ही संधी दिलीत, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत’.
हेही वाचा – यूपीएससीची मोठी कारवाई! पुजा खेडकर यांची उमेदवारी रद्द
कार्यक्रमाला शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनच्या अध्यक्ष्या सुवर्णा (गीता) गोडबोले, उपाध्यक्ष लायन सतीश राजहंस, खजिनदार सुजय गोडबोले, सदस्य प्रतीक भोसले, प्रशांत शितूत, सत्यजित शिंदे, रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड तर्फे, प्रेसिडेंट पराग गाडगीळ, सेक्रेटरी देवदत्त हंबर्डीकर, प्रसाद कुंभोजकर, गिरीश ब्रह्मे, डॉ. मंजिरी हंबरडीकर आणि लायन्स क्लबचे शामा गोयल, प्रसन्न भांडारकर हे उपस्थित होते.
प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्तीपत्रक, शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनतर्फे एक स्टेनलेस स्टीलचा टिफिनचा डबा व रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड यांच्यातर्फे रेनकोट भेट देण्यात आले. हे शिबीर आयोजित करण्यासाठी पोलीस आरोग्य समन्वयक अमोल क्षीरसागर ,पर्णल देखणे यांचे सहकार्य लाभले.