ताज्या घडामोडीपुणे

येरवडा स्लॅब दुर्घटने प्रकरणी पोलिसांकडून चार जणांना अटक

पुणे | पुण्यातील येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅब साठी तयार करण्यात आलेला लोखंडी जाळ्याचा सांगाडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता. पुणे पोलिसांनी या प्रकरणी ब्लू ग्रास बिजनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शनवर सदस्य मनुष्यवधाचा आणि इतर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता मोठी कारवाई केली असून चार जणांना अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

गुरुवारी रात्री लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू असताना हा अपघात झाला होता. लोखंडी जाळी असून त्याखाली 10 ते 12 कामगार अडकले होते. त्यानंतर दोन तास सुरू असलेल्या बचावकार्यानंतर जाळी खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. यातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले होते.

येरवडा पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी दोषी असणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. सीनियर सिटी सुपरवायझर इमतियाज अबुल बरकात अन्सारी, लेबर कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर मोहम्मद आलम, प्रोजेक्ट मॅनेजर असिस्टंट विजय धाकतोडे आणि प्रोजेक्ट मॅनेजर मजीत खान अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button