ताज्या घडामोडीपुणे

स्मशानभूमीत दहनासाठी गॅसच्या ‘एलपीजी’ ऐवजी ‘पीएनजी’ पद्धत

पुणे | पुणे महापालिकेच्या विविध स्मशानभूमीतील गॅस दाहिनींमध्ये मृत व्यक्तिंच्या शवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (एमएनजीएल) या शासनमान्य कंपनीकडून आवश्यक असणाऱ्या गॅसची खरेदी तसेच गॅसपाईप लाइन आणि मीटरिंग स्टेशनची कामे करून घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.माध्यमांशी बोलताना रासने म्हणाले, ‘शहरातील स्मशानभूमींमध्ये पारंपरिक पद्धतीने लाकडांवर आणि विद्युत व गॅसवरील दाहिनींमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. सध्या एलपीजी गॅसवर आधारित शवदहन केले जाते. ही पद्धत पर्यावरणपूरक आणि मोफत असल्याने ती वापरण्याकडे नागरिकांचा कल आहे. एलपीजी सिलेंडरच्या खरेदीसाठी सिलेंडर 1235 रुपये खर्च होतो. गेल्या आर्थिक वर्षात 13 स्मशानभूमींमध्ये 4393 मृतदेहांवर या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी 4248 सिलेंडर वापरण्यात आले असून एकूण पाच कोटी ९४८४ रुपये इतका खर्च झाला.’

रासने पुढे म्हणाले, ‘सध्या एलपीजी आधारित गॅस दाहिनीऐवजी पाईप नॅचरल गॅसवर (पीएनजी) आधारित गॅस दाहिनीचा वापर करण्याचा विचार विद्युत विभाग करीत आहे. त्यामुळे एलपीजी सिलेंडरच्या निविदा प्रक्रियेतील अडचणी, होणारा विलंब, साठवणुकीची अडचण आणि वापरामधील सर्व समस्यांवर पीएनजी पद्धतीने मात करणे शक्य होणार आहे. तसेच शवदहनासाठी आवश्यक असणारा निरंतर इंधन पुरवठा होण्यास मदत होणार आहे’.

शहरातील १९ स्मशानभूमींमध्ये पीएनजी पद्धतीने पुरवठा करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार एमएनजीएलच्या वतीने इंडस्ट्रिअल दराने गॅस पुरवठा करण्यात येणार असून, अंदाजे १२ हजार दहा मीटरची पाईप लाइन बसविणे, मीटर व रेग्युलेटिंग युनिट बसविण्यात येणार आहे. पाईप लाइनसाठी आवश्यक असणार्या खोदाईचे शुल्क महापालिका आकारणार नसून त्या बदल्यात पाईप लाइन बसविण्याचे काम एमएनजीएल विनामूल्य करणार असल्याचे रासने यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button