पुण्यात जीवनविद्या मिशनतर्फे ‘‘विश्वप्रार्थना जप’’ चे आयोजन
सद्गुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दी महोत्सव : श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे होणार व्यख्यान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Untitled-design-1-1-780x470.jpg)
पुणे : जीवनविद्या मिशनतर्फे सद् गुरू श्री वामनराव पै जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त विश्वशांतीसाठी, विश्वकल्याणकारी ‘विश्वप्रार्थना जप’चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात उद्योगरत्न रतन टाटा यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुण्यातील एस.पी. कॉलेज मैदान, टिळकरोड येथे रविवार, दि. ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सांयकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून, यावेळी श्री प्रल्हाद वामनराव पै यांचे ‘‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची’ या हेतूने जीवनविद्या मिशनने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ७९७२३९९७५१ यांच्याशी संपर्क साधावा, आवाहन केले आहे.
जीवन विद्या मिशन ही समाजाच्या उत्कर्षासाठी आणि उन्नतीसाठी झटणारी एक संस्था आहे. सद्गुरू वामनराव पै हे १९५५ सालापासून ह्या संस्थेच्या माध्यमातून जीवन विद्येचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
हेही वाचा – ‘पुणे की पसंत मोरे वसंत!’; वसंत मोरेंचं आजचं स्टेटस चर्चेत
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार…
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या सिद्धांताभोवती जीवनविद्येचे तत्त्वज्ञान फिरते. सुरुवातीच्या काळात मुंबईमध्ये जीवनविद्येचा प्रसार झाला. आजमितीला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीवनविद्येची केंद्रे सुरू झाली आहेत व लाखो लोकांनी जीवनविद्येचा स्विकार केलेला आहे. ‘‘हे जग सुखी व्हावे’’, ‘‘हे हिंदुस्तान राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे.’’ असे दोन संकल्प मिशनचे आहेत, अशी माहिती नामधारक वृषाली शिंदे यांनी दिली.