स्वामी भक्तांकडून श्री खंडोबा व म्हाळसा देवीचे चांदीचे मुखवटे अर्पण
अध्यात्मिक : खंडोबा-म्हाळसा देवींच्या मुखवट्यांचा भक्तिभावाने अभिषेक

पुरंदर | सोलापूर येथील स्वामी भक्त बाळासाहेब गायकवाड यांनी आपल्या आई-वडिलांच्या कै. रामदास गायकवाड व कै. जनाबाई गायकवाड स्मरणार्थ श्री स्वामीमय सेवा ट्रस्टच्या नव्याने स्थापन झालेल्या श्री स्वामी समर्थ महाराज मठाला श्री खंडोबा व म्हाळसा देवीचे तीन किलो वजनाचे चांदीचे मुखवटे अर्पण केले.
महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाच्या मंदिरात विधिवत अभिषेक करून हे चांदीचे मुखवटे श्रीक्षेत्र जेजुरी येथून श्रीक्षेत्र अक्कलकोटकडे जाणाऱ्या सोहळ्यातील पालखीमध्ये प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत.
हेही वाचा : जेजुरी | शिवसेना शिंदे गटाच्या अमृता भोसले यांचा अर्ज दाखल; प्रचाराला सुरुवात
या कार्यक्रमास श्री स्वामीमय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष भगवान डिखळे, उपाध्यक्ष माऊली खोमणे, कार्याध्यक्ष गणेश मोरे, सचिव ज्ञानेश्वर मोरे, विश्वस्त महेश कदम, कबीर मोरे, रोहित जगताप तसेच सेवेकरी प्रवीण हेंद्रे, निलेश देशपांडे, गोविंद बेलसरे, संदीप गायकवाड आणि गायकवाड परिवार उपस्थित होते.




