Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जेजुरी | शिवसेना शिंदे गटाच्या अमृता भोसले यांचा अर्ज दाखल; प्रचाराला सुरुवात

महिलांच्या सुरक्षेसह स्थानिक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर देण्याचे अमृता भोसले यांचे आश्वासन

जेजुरी | जेजुरी नगरपरिषद निवडणुकीला वेग येत असताना शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेतृत्वाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. लवथळेश्वर प्रभागातून अॅड. अशोक भोसले यांच्या पत्नी आणि उच्चशिक्षित कायदातज्ज्ञ अमृता भोसले यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेतून अधिकृतरित्या अर्ज दाखल केला.

अर्ज भरल्यानंतर अध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठल सोनवणे आणि नगरसेवक उमेदवार गणेश भोसले यांच्या उपस्थितीत शिवाजी चौकातील जेजुरीच्या ऐतिहासिक पहिल्या पायरी मार्गाचे दर्शन घेऊन प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली.

अमृताताई भोसले या कायद्याचे शिक्षण घेत असून सामाजिक भान जपत लवथळेश्वर विभागातील पाणीपुरवठा, रस्ते, सुरक्षितता आदी प्रश्नांवर सातत्याने काम करीत आहेत. विशेषतः महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, मुलांच्या सुविधा आणि स्थानिक पातळीवरच्या अनेक तक्रारी यावर त्या नियमितपणे जनजागृती करतात.

हेही वाचा     :        देवस्थान ट्रस्टमध्ये गुरव–पुजारी समाजाच्या प्रतिनिधीत्वाला ‘बळ’

आगामी निवडणुकीत निवडून आल्यास महामार्गांवर होत असणारे अपघात रोखण्यासाठी तसेच महिलांना व विद्यार्थ्यांना सुरक्षित ये-जा करता यावी यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. आपल्या शिक्षणाचा आणि समर्थ विचारांचा उपयोग समाजातील गरजू घटकांसाठी करणे हा आपल्या उमेदवारीमागील मुख्य हेतू असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. मतदारांनी आपल्याला साथ देऊन जेजुरीच्या विकासयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन अमृताताईंनी केले. त्यांच्या उमेदवारीचे शहरात सर्वत्र स्वागत होत आहे.

जेजुरीतील प्रत्येक कुटुंब सुरक्षित, सक्षम आणि सशक्त व्हावे, हीच माझी प्राथमिकता आहे. महिला आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, तसेच अपघातमुक्त महामार्गासाठी ठोस पावले उचलणे हे माझे प्रमुख ध्येय आहे. विकास हा घोषवाक्य नसून प्रत्यक्षात उतरलेल्या कामातूनच सिद्ध होतो, आणि तेच काम करण्यासाठी मी लोकांसमोर उभी आहे.

– ॲड. अमृता भोसले, शिवसेना.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button