breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वडगाव पठार येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्याची राष्ट्रवादीची मागणी

पुणे | प्रतिनिधी
सिंहगड रस्त्यावरील महावितरणच्या वडगाव उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत धायरी, नऱ्हे, खडकवासला, किरकाटवाडी, नांदेड, वडगाव बुद्रुक, हिंगणे खुर्द या गावांचा समावेश असून यापैकी वडगाव पठार या भागात महावितरणचा ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नसल्याने अजूनही विजेचा लपंडाव सुरूच असतो. त्यामुळे या भागात तातडीने ट्रान्सफॉर्मर बसवावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे खडकवासला मतदारसंघाचे कार्याध्यक्ष श्रीहरी (शरद) दबडे पाटील यांनी महावितरणचे अतिरिक्त अभियंता कल्याण गिरी यांच्याकडे निवदनाद्वारे केली आहे.

वडगाव उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत महावितरणचे एक लाख बासष्ट हजार वीजग्राहक आहेत. तसेच झपाट्याने विकसित होत असणारा भाग असल्याने नव्या वीजग्राहकांची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. परंतू महावितरण सर्वच वीजग्राहकांना सुविधा पुरविण्यास अपयशी ठरत आहे. सर्व्हे नंबर ४८ मध्ये असणाऱ्या वडगाव पठार या परिसरात अनेकदा वीज उपलब्धच होत नाही किंवा वीजपुरवठा हा सातत्याने खंडीत असतो. त्यामुळे तेथील नागरिकांची अनेक कामे प्रलंबित रहातात.

अनेकदा पाणी भरण्यासाठी देखील वीज उपलब्ध होत नसल्याने याचा परिणाम तेथील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर देखील होत आहे. त्याबरोबरीने येणाऱ्या काळात १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील असल्याने वडगाव पठार येथील नागरिकांच्या समस्येत नवीन भर पडली आहे. त्यामुळे महावितरणने त्वरीत वडगाव पठार, पठार वस्ती येथे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, अन्यथा वडगाव उपविभागीय कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दबडे पाटील यांनी दिला आहे.

महावितरण ग्राहकांना सुविधा पुरविण्यास अपयशी ठरले असून त्यांनी देखील वडगाव पठार येथील नागरिकांप्रमाणे अंधारात जीवन जगावे, तरच अधिकाऱ्यांना विजेचे किंमत कळू शकेल.

श्रीहरी (शरद) दबडे पाटील,
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस,
खडकवासला मतदारसंघ

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button