राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना, एन एस पी 2.0 पोर्टल 22 जानेवारी 2026 पर्यंत पुन्हा सुरु…

पुणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन 2025-26 साठी नुतनीकरणास पात्र असलेले तसेच सन 2024-25 मधील डी-डुप्लिकेशन प्रक्रियेत समाविष्ट असलेले विद्यार्थी, जे विहित कालावधीत अर्ज करु शकले नव्हते त्यांच्यासाठी एन एस पी 2.0 पोर्टल 22 जानेवारी 2026 पर्यंत पुन्हा सुरु करण्यात आले आहे.
सर्व संबंधित शाळांनी पात्र विद्यार्थ्यांचे नूतनीकरण अर्ज एन एस पी 2.0 पोर्टलवर 22 जानेवारी 2026 पूर्वी ऑनलाईन सादर करुन घ्यावेत. तसेच सर्व अर्जांची प्रथम स्तर व द्वितीय स्तर पडताळणी पूर्ण करावी.
हेही वाचा – शहराला पोलीस छावणीचे स्वरूप! १२ हजार जवानांचा खडा पहारा; पहा बंदोबस्ताचा ‘मास्टर प्लॅन’
कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नसल्याने सर्व प्रक्रिया तातडीने व वेळेत पूर्ण करण्याबाबत कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक, शिक्ष्ज्ञण संचालनाय (योजना) यांनी पसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.




