Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री ! CNG च्या दरामध्ये पुन्हा वाढ

पुणे : पुणेकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे, कारण, CNGच्या दरांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. एमएनजीएलकडून सीएनजीच्या दरांमध्ये 1.10 रुपये प्रति किलो इतकी दरवाढ करण्यात आली आहे. सी एन जी साठी आता नवीन किंमत 89 रुपये प्रति किलो इतकी राहणार आहे. याआधी सीएनजीचा दर 87.90 प्रति किलो इतकी होता. आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर 89 रुपये प्रतिकिलोवर पोहचले आहेत. ही दरवाढ जागतिक बाजारातील चढ-उतारांचा थेट परिणाम असल्याचे सांगितले जातं आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरात प्रतिकिलो 1.10 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. नवीन आज पासून हे दर लागू झाले असून पुणे आणि परिसरात दर 89 रुपये प्रतिकिलो रुपये प्रतिकिलो झाला आहे. या दरवाढीमुळे ‘सीएनजी’वर धावणाऱ्या वाहनांच्या खर्चात वाढ झाली आहे.

हेही वाचा –  अजितदादांची NCP दिल्ली विधानसभेच्या मैदानात; पहिल्या यादीत 11 उमेदवार

या आधी विधानसभा निकालापूर्वी राज्यात ‘सीएनजी’च्या दरात वाढ झाली होती. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले म्हणून वाहनचालक ‘सीएनजी’कडे वळले आहेत. त्यात आता ‘सीएनजी’च्या दरातही वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे, त्यामुळे त्यांची अवस्था दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे.

शहरात साधारण सर्व रिक्षा ‘सीएनजी’वर चालतात. यामुळे ही दरवाढ खिशाला चटका देणारी आहे. याकडे शासनाने गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. कारण सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ‘सीएनजी’वर अवलंबून आहे. दरात वाढ झाल्यामुळे व्यवसाय करणे अशक्य झाल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे.

तर आयात नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेली झपाट्याने वाढ आणि बाजारातील दरांवर आधारित पुरवठा याचं संतुलन करण्याचं मोठं आव्हान MNGLसमोर असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वाढीमध्ये उत्पादन शुल्क आणि राज्य व्हॅटचा समावेश असेल, जे एकूण वाढी पैकी सुमारे 15% आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button