breaking-newsताज्या घडामोडीपुणे
मुसळधार पावसामुळे माळीण ते कुंभेवाडी रस्ता दरड कोसळण्यामुळे बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-56-2-780x470.jpg)
पुणे : पुणे जिल्ह्यात आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. अशातच ग्रामपंचायत असाणे येथील माळीण ते कुंभेवाडी हा रस्ता दरड कोसळ्यामुळे बंद झाला आहे त्याबाबत तहसीलदार आंबेगाव पाहणी करून जेसीबी व इतर मशीनच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्यात येत आहे.
हेही वाचा – Positive Initiatives | नैसर्गिक आपत्तीच्या काळात आमदार महेश लांडगे यांची सतर्कता!
याबाबतची माहिती मिळत आहे की, पुणे परिसरातील आजूबाजूला 400 ते 500 मिलीमीटर पाऊस झाला आहे.त्यामुळे शहरात झाडे पडण्याच्या,भिंती पडण्याच्या तसेच आगीच्या घटना घडताना समजत आहेत.दरम्यान, ग्रामपंचायत असाणे येथील माळीण ते कुंभेवाडी हा रस्ता दरड कोसळ्यामुळे बंद झाला असल्याचे समजते.