breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#Lockdown: हुक्का व तंबाखूजन्य पदार्थांची ऑनलाईन विक्री, पुण्यात ४ जणांना अटक

देशभरात सध्या करोनामुळे आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांना करोनाचा चांगलाच फटका बसला आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. या काळात जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व गोष्टींची दुकानं बंद आहेत. मात्र पुण्यात ऑनलाईन हुक्का पॉट आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे.

पोलीस उप-आयुक्त बच्चन सिंह यांच्या पथकाला ऑनलाईन हुक्का विक्रीची माहिती समजली होती. पोलिसांच्या पथकाने या ऑनलाईन विक्री रॅकेटचा सर्व बाजूंनी अभ्यास करत सापळा रचला. कोंढवा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी मित विजय ओस्वाल, रॉयल जयराम मधुराम, परमेश ठक्कर यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात ताब्यात घेण्यात आलेले तिन्ही आरोपी हे माल ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचं काम करत होते. पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून ६ हुक्का पॉट, सहा तंबाखूची पाकीटं, चार मोबाईल व अन्य महत्वाच्या वस्तू असा ८४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी पुढील कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपी, प्रतिक मेहता यालाही धनकवडी भागातून अटक केली आहे. या कारवाईतही पोलिसांनी जवळपास ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कोंढवा पोलीस ठाण्याच चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button