breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#Lockdown:सण, जयंतीसाठी एकत्र येण्यास मनाई, पुणे पोलिसांचे आदेश
सण, जयंतीसाठी एकत्र येण्यावर पुणे पोलिसांनी बंदी घातली आहे, असे आदेशही पुणे पोलिसांनी नागरिकांना दिले आहेत. आज (19 मे) रात्री 12 पासून ते 1 जून रात्री 12 पर्यंत म्हणजे 14 दिवस हा आदेश लागू असणार आहे. या महिन्यात रमजान ईद, महाराणा प्रताप जयंती, स्वातंत्र्यवीर सावरकर जंयती आणि अहिल्याबाई होळकर जंयती साजरी होणार आहे. दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिक एकत्र येत असतात, ती गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी हे आदेश दिले आहेत.