TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे
विश्वबंधुत्व दिनानिमित्त आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान ; विवेकानंद केंद्राच्या वतीने आयोजन
![Lecture by Anand Nadkarni on the occasion of World Brotherhood Day; Organized on behalf of Vivekananda Centre](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/WhatsApp-Image-2022-09-29-at-1.25.25-PM.jpeg)
पुणे: विश्वबंधुत्व दिन निमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या पुणे शाखेने ‘स्वामी विवेकानंदांचे विश्वबंधुत्व आणि आजचा युवक’ या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हे व्याख्यान गुरुवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता बाल शिक्षण मंदिर सभागृह ,मयूर कॉलनी( कोथरूड )येथे होणार आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी पुणे शाखेचे संचालक जयंत कुलकर्णी यांनी पत्रका द्वारे ही माहिती दिली.
स्वामी विवेकानंदांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील व्याख्यानात ‘माझ्या बंधू आणि भगिनींनो ‘या शब्दांनी संपूर्ण विश्वातील मानवतेला साद घातली होती. हा दिवस विवेकानंद केंद्रामध्ये ‘विश्वबंधुत्व दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांचा एक भाग म्हणून हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.