breaking-newsताज्या घडामोडीपुणे

खडकवासला धरणावर लेझर शो! तिरंग्याच्या रंगातील नेत्रदीपक विद्युत रोषणाईने परिसर प्रकाशित

पुणे: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने मंगळवारी धरणाच्या सांडव्यावर तिरंग्याच्या रंगातील नेत्र दीपक असे विद्युत रोषणाई केली आहे. तर १४ ऑगस्ट रोजी रात्री देशभक्तीपर विषयावरील लेझर शो आयोजित करण्यात आला आहे.

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेसहा ते पावणेदहा वाजेपर्यंत लेझर शो सुरू होईल. धरणालगतच्या पुलावरून हा लेझर शो पाहता येईल. याचबरोबर, धरण हे राष्ट्रीय जलसंपत्ती आहे. तिची ओळख व्हावी

यासाठी सातवीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित स्वरूपात १५ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या भिंतीच्या परिसरात विद्यार्थ्यांना (पालकांच्या सोबत) शाळेचे ओळखपत्र पाहून सोडण्यात येईल.’

हेही वाचा    –   ..तर लाडकी बहीण योजना बंद करण्याचे आदेश देऊ; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मागील वर्षी पासून धरणाच्या सांडव्यावर विद्युत रोषणाई केली जात आहे. यंदा ही स्थिर रोषणाईसह आकाशात प्रकाशाचे धवल रंगाचे प्रकाशझोत टाकण्यात आलेले आहे. केशरी, पांढऱ्या व हिरव्या रंगातील फुग्यांच्या कमानी करण्यात आल्या आहेत.

पानशेत व वरसगाव धरणावर सांडव्यावर अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली असली तरी धरणाच्या सांडव्यातून नदीमध्ये कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.

दरम्यान, आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या कालव्यातून १००५ क्युसेक पाणी सोडले जात आहे. या धरणात सायंकाळी पाच वाजेपर्यंत १.७७ टीएमसी म्हणजे ८९.८४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत धरणात धरणात १०.५१ टीएमसी म्हणजे ९८.६७ टक्के पाणीसाठा आहे.

वरसगाव धरणातून वीज निर्मिती पाणी सोडणे आज बंद केले आहे. या धरणात १२.३९ टीएमसी म्हणजे ९६.६३ टक्के पाणीसाठा आहे. टेमघर धरणात ३.७१ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा आहे. धरण भरल्याने ११४ क्युसेक पाणी सांडव्यावरून वाहत आहे. वीज निर्मितीसाठी २७५ क्युसेक सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button