breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपुणे

महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पुण्यात क्रांतिसुर्य व क्रांतीज्योती पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

परिवर्तन सामाजिक संस्था व जगदीशब्द फाउंडेशन यांच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतीसुर्य व क्रांतीज्योती राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे संपन्न होणार आहे.

या पुरस्कार वितरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वात्रटिकाकार व साहित्यिक रामदास फुटाणे असणार आहेत. प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या दिशा पिंकी शेख, आझम कॅम्पसचे पी.ए. इनामदार, भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, पत्रकार श्रीरंग गायकवाड, मुंबई उच्च न्यायालयातील वकील विजय कुरले, बार्टी संस्थेचे डेप्युटी कमिशनर उमेश सोनवणे यांच्यासह व्याख्याते जगदीश ओहोळ व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिली माध्यमांना दिली.

राज्यातील उत्कृष्ट कार्य असणाऱ्या शिक्षक, शिक्षिका यांच्यासह पत्रकार, वकील, डॉक्टर, सामाजिक, राजकीय नेतृत्व, साहित्यिक, स्पर्धा परिक्षा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना क्रांतीज्योती व क्रांतीसुर्य पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button